Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

प्रभाग 15 मध्ये योगेंद्रदादा थोरात यांची दमदार एन्ट्री; 250 कामगारांना शासकीय योजनांचा लाभ

 सांगली – प्रभाग 20 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी आता प्रभाग 15 मधून निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. प्रभाग 20 प्रमाणे प्रभाग 15 चाही सर्वांगीण विकास करण्याचा दृढ संकल्प त्यांनी केला असून, त्याच्या सुरुवातीचा टप्पा म्हणून राज्य सरकारच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ प्रभाग 15 मधील 250 हून अधिक कामगारांना मिळवून दिला आहे.


शान ए हिंद हॉलमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगेंद्रदादा थोरात यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना साहित्य पेटीचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना शेख आणि शिरीन शिरोळकर यांच्या माध्यमातून राबवण्यात आला.

योगेंद्रदादा थोरात यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “प्रभाग 20 मध्ये जसा विकास घडवून आणला, तसाच प्रभाग 15 मधील नागरिकांनाही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.” रस्ते, पाणी, गटार अशा मूलभूत सुविधांसह विविध योजनांद्वारे प्रभाग 15 चा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

#योगेंद्रदादाथोरात #प्रभाग15 #सांगली #बांधकामकामगार #शासकीययोजना #महिलासन्मान #राजकारणएन्ट्री #सांगलीविकास

Post a Comment

0 Comments