Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

पुण्यात बुलेट चोरांच्या टोळीचा पर्दाफाश; सात लाखांच्या १० मोटारसायकली हस्तगत

 पुणे – विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चोख गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ७ लाख रुपये किंमतीच्या १० चोरीच्या बुलेट मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

विमानतळ पोलीस ठाणेतील कर्मचारी दादासाहेब बर्डे आणि ज्ञानदेव आवारी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संजयपार्क परिसरात दोन इसम चोरीच्या बुलेट मोटारसायकलसह थांबले आहेत. ही माहिती तपास पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना देण्यात आली.

त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करत मनिषसिंग जितेंद्रसिंग भदोरिया (वय २१, महादेवनगर, लोहगाव)कार्तिक अनिल फुलपगार (वय २१, लोहगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी १० मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यातील ७ दुचाकी विमानतळ पोलीस ठाणे हद्दीतील, १ दुचाकी कोथरूड पोलीस ठाणे हद्दीतील असून २ दुचाकींचा तपास सुरु आहे.

या कारवाईत एकूण सात लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई मा. श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, पुणे), मा. हिम्मत जाधव (पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४), श्रीमती प्रांजली सोनवणे (सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग) यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या तपासकार्यात सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, तसेच पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कन्हे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली.

Post a Comment

0 Comments