Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

नातवंडांच्या उपस्थितीत केला ज्येष्ठांचा भावपूर्ण सत्कार

 गोंदिया:- जागतिक ‘ज्येष्ठ नागरिक दिन’ 1आक्टोबरला  अनुसूचित जाती व नवबौद्धध मुलींच्या शासकीय निवासी शाळेत अत्यंत आदरयुक्त वातावरणात आणि कौटुंबिक स्नेहाने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थिनींचे स्वतःचे आजी-आजोबा हेच सन्माननीय ज्येष्ठ नागरिक म्हणून उपस्थित होते, ज्यामुळे सोहळ्याला एक वेगळी भावनिक किनार लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक माननीय नरेंद्र मेंढे हे होते, तर शाळेच्या विद्यार्थिनींचे आजी-आजोबा हेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठरले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला  प्रवीण कौंडलकर यांनी प्रास्ताविक करताना, त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचे मार्गदर्शन घेणे आजच्या पिढीसाठी किती आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकला. तसेच कुटुंबात व समाजात ज्येष्ठांचे असलेले अनमोल स्थान विशद केले. यावेळी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत त्यांच्याच आजी-आजोबांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मिळालेला हा आदर पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

मुख्याध्यापक नरेंद्र मेंढे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, "आजचा दिवस केवळ सन्मान करण्याचा नाही, तर आपल्या आजी-आजोबांना नेहमी आदराची वागणूक देण्याचा संकल्प करण्याचा आहे. "ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा आधारस्तंभ आहेत. घरात आणि समाजात त्यांना आदराची  वागणूक देणे हे आपले परम कर्तव्य आहे. त्यांचे आशीर्वाद आणि अनुभव हेच आपल्यासाठी जीवनातील सर्वात मोठे मार्गदर्शन आहे." शाळेतील गुणी विद्यार्थिनींनी आपल्या आजी-आजोबांसाठी खास गीत व नृत्य सादर करून त्यांचे मनोरंजन केले. त्यांच्या या कलागुणांना ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून दाद दिली. 

हा कौटुंबिक आणि संस्कारमय सोहळयाचे सूत्र संचालन इयत्ता दहावी ची विध्यार्थीनी  प्रणाली गोवर्धन अलोणे तर आभार प्रदर्शन . अंतरा संतोष कोरडे हिने केले. हा संस्कारमय सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहाय्यक शिक्षक प्रीती घरडे, उमेश ढवळे,सत्वशीला उंदिरवाडे, मनोज कामडी, विजय बर्वे, तस्नीम तुरक शिवकुमार चौधरी तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींना कौटुंबिक मूल्यांचे आणि आदराचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजू शकले

Post a Comment

0 Comments