Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

कुपवाडमध्ये तरुणाचा धक्कादायक प्रकार; तरुणीवर लग्नासाठी दबाव, पोलिसांनी सुरक्षितपणे घेतले ताब्यात

 



कुपवाड | प्रतिनिधी

तरुणीने लग्नास होकार द्यावा, यासाठी दबाव टाकत टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी देणाऱ्या २२ वर्षीय युवकाला कुपवाड पोलिसांनी आज ताब्यात घेतले. पोलिसांच्या सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर युवकाची समजूत काढून त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

अजय अविनाश जाधव (वय २२, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड) असे संबंधित युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाचा एका तरुणीसोबत वाद झाला होता. त्यानंतर त्याने तरुणीने लग्नास होकार द्यावा, अशी मागणी करत टोकाचे पाऊल उचलण्याची धमकी दिली. या प्रकाराची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने युवकाशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली. सहाय्यक पोलिस फौजदार जितेंद्र जाधव यांनी युवकाची समजूत काढत त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात घेतल्यानंतर युवकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

प्राथमिक चौकशीत हा प्रकार एकतर्फी प्रेमाच्या वादातून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. संबंधित तरुणीला होणाऱ्या त्रासाची दखल घेत पोलिसांनी युवकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांचा इशारा

या घटनेबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

“एकतर्फी प्रेमातून अशा घटना घडणे गंभीर आहे. मुली व महिलांना त्रास देणे, दबाव आणणे, ब्लॅकमेल करणे किंवा प्रेम सिद्ध करण्यासाठी धोकादायक प्रकार करणे चुकीचे आहे. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांची गय केली जाणार नाही.”

दरम्यान, या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई कुपवाड पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments