Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

Virat Kohli Property : विराटने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी, आलिशान बंगला ते लक्झरी फ्लॅट... जाणून घ्या काय काय दिले; लंडनला होतोय शिफ्ट ?

Virat Kohli property transfer to brother: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने आपल्या गुरुग्राम येथील आलिशान प्रॉपर्टीची पावर ऑफ अटर्नी आपल्या भावाच्या, विकास कोहलीच्या नावावर केली आहे.

Virat Kohli Transfers Property Rights To Brother Vikas Kohli: भारतीय संघाचा सुपरस्टार विराट कोहली हा लंडनला शिफ्ट होतोय, अशी शक्यता आता आणखी बळावली आहे. राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना विराट त्याची पत्नी अनुष्का व दोन मुलांसह लंडनमध्येच असतो. आताही तो आयपीएल २०२५ नंतर १४ ऑक्टोबरला भारतात आला आणि १५ तारखेला टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला. या एका दिवसात त्याने त्याची गुरुग्राम येथील संपत्ती मोठा भाऊ विकास कोहली याच्या नावावर केली आहे.

विराट लंडनला स्थलांतरित झाला आहे, असा अनेक वृत्तांमधून दावा केला गेला आहे. पण, विराटने स्वतः याबाबत कधीच काही जाहीर केलेले नाही. तो देशाबाहेर बहुतेक वेळ घालवतो आणि त्यामुळेच विराटने त्याचा मोठा भाऊ विकासला जनरल पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. जेणेकरून विकासला कोणतेही सरकारी काम किंवा मालमत्तेशी संबंधित कोणताही कायदेशीर निर्णय घेताना वारंवार त्रास होऊ नये.

Viral Video : क्या हाल है भाई! Rohit Sharma ने नवा कर्णधार शुभमनला पाहताच विचारला प्रश्न, विराट कोहलीला केला मुजरा; मन जिंकणारा क्षण

विराट मंगळवारी तहसील कार्यालयात तासभर थांबला होता आणि १५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी तो लंडनहून दिल्लीला पोहोचला. तो कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी गुरुग्राम तहसील कार्यालयात गेला. त्याला पाहण्यासाठी तिथे गर्दी जमली. गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज १ मध्ये विराटचा एक आलिशान बंगला आहे. त्याने २०२१ मध्ये हा बंगला खरेदी केली होता. तसेच एक आलिशान फ्लॅट देखील आहे. दोन्ही मालमत्ता आता त्याचा मोठा भाऊ विकास सांभाळेल.

विराटचे मुंबईत एक घर आहे आणि त्याच्याकडे अनेक मालमत्ता आहेत. देशभरात त्याच्याकडे अनेक रेस्टॉरंट्स ( One8) देखील आहेत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि टीम इंडियाचे सर्व खेळाडू आज ऑस्ट्रेलियात दाखल झाले. विराट आणि रोहित शर्मा हे वन डे मालिकेत खेळणार आहेत आणि या मालिकेतील कामगिरीवर त्यांचे २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणे अवलंबून आहे.


Post a Comment

0 Comments