सांगलीत माय ह्युंदाई शोरूममध्ये थरारक चोरी; दहा लाखांचा ऐवज लंपास, चोरट्यांची सुरक्षा रक्षकांवर दगडफेक
तिजोरीत ९,५३२ रुपयांच्या सोन्याच्या नथ आणि ९,५९,४५१ रुपयांची रोकड असा एकूण दहा लाख रुपयांचा ऐवज होता. चोरीवेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना तपासणी करताना पाहिलं आणि त्यांच्यावर दगडफेक करत पळ काढला.
शोरूमच्या कर्मचारी संतोष रधुनाथ कोळी (वय ३७, रा. पद्माळे, ता. मिरज) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, ग्रामिण पोलीस निरीक्षक किरण चौगले, एलसीबी निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथक व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
0 Comments