Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

गोंदियात भारतीय बौद्ध महासभेची जिल्हास्तरीय सभा; नवीन कमिट्यांची होणार स्थापना

 बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हास्तरीय सभेचे आयोजन शनिवार, 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले आहे. ही सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मरारटोली, गोंदिया बस स्टॉपसमोर होणार आहे.

या सभेमध्ये नवीन गोंदिया जिल्हा कमिटी गठीत करण्यात येणार असून, आठही तालुक्यांतील कमिट्या व महिला कमिटी तयार करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यासोबतच बौद्ध महासभेच्या दहा उद्दिष्टांवर कार्य करण्यासाठी दिशा व मार्गदर्शनही केले जाणार आहे.

या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य महासचिव विजय बन्सोड भूषवतील. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ प्रभारी अशोक गडकरी, विदर्भ प्रभारी निरज ताकसांडे, राज्य कमिटी सदस्य महेंद्र मेश्राम, प्रीती रामटेके, जिल्हा प्रभारी सुनील आवडे यांची उपस्थिती लाभणार आहे.

गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून – गोंदिया, तिरोडा, आमगाव, सालेकसा, गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव येथील उपासक-उपासिका, बुद्ध व बाबासाहेबांच्या कार्यावर श्रद्धा असणारे कार्यकर्ते आणि महासभेचे आजी-माजी पदाधिकारी यांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments