सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे कंत्राटी बाग कामगारांच्या न्यायहक्कासाठी आज जोरदार आवाज उठवण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल तर्फे निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी विभागीय कामगार सेलचे कार्याध्यक्ष मनोहर माळी, सांगली जिल्हा सचिव नितीन माने, मकसूद कुलकर्णी, तसेच बाग कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांनी एकमुखाने आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला.
मुजफ्फर सनदी, सांगली शहर जिल्हाध्यक्ष – राष्ट्रवादी असंघटित कामगार सेल यांनी सांगितले की, "कामगारांचे शोषण सहन केले जाणार नाही. योग्य न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील."
0 Comments