पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ धुळे शहरात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आक्रमक झाले असून, त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन सादर करून बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसेविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एकमुखी मागणी केली.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
-
बंगालमधील हिंसाचार प्रकरणाची एनआयएमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
-
दोषींवर कठोर शासन व्हावे.
-
कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपविण्यात यावी.
-
बंगालमधील बांग्लादेशी व रोहिंग्या घुसखोरांना शोधून देशाबाहेर हाकलण्यात यावे.
-
बंगाल व बांग्लादेश सीमारेषेवर (४५० किमी) तात्काळ तार fencing लावण्यात यावी आणि हे काम तत्काळ पूर्ण करावे.
या निदर्शनांमध्ये अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. मात्र, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments