सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात कोल्हापूर चाळ भागात एक थरारक घटना उघडकीस आली आहे. प्रकाश कांबळे (राहणार पाटील मळा, मिरज) या मजुराचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे.
स्थानिक नागरिकांना एका झाडाखाली अंधारात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यानंतर तातडीने पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले. काही वेळातच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणल गिर्डा आणि महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदर प्रकरणाचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0 Comments