गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील नवेझरी गावाजवळ सोमवारी (दि.१६ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास एका दुर्दैवी अपघातात गट सचिव विनोद तिजारे (वय ५०, रा. पालोरा, जिल्हा भंडारा) यांचा मृत्यू झाला.
विनोद तिजारे हे आपल्या कार्यालयीन कामानिमित्त तिरोडा येथे गेले होते. काम आटोपून ते दुचाकी क्रमांक एम.एच. ३६/व्ही ११२२ ने नवझेरी मार्गे आपल्या गावी परत जात असताना, गणेश सर्व्हिस पेट्रोल पंप जवळ उभ्या असलेल्या ट्रक (एम.एच. ०४/एफ.व्ही. ९१५१५) ला त्यांची दुचाकी जोरात आदळली. या भीषण अपघातात त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला.
घटनेनंतर तातडीने पेट्रोल पंपातील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना रुग्णवाहिकेतून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती तिरोडा पोलीस स्टेशन ला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
0 Comments