Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शासनाच्या योजना राबविण्याचा संकल्प — आमदार सत्यजित देशमुख

 शासनाच्या विविध योजना मतदारसंघात राबवून तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून केंद्र सरकारचा जीएसटी कपातीचा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायद्याचा आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

शिराळा येथे श्री. शिवाजीराव देशमुख रुरल डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन, शिराळा यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत फिरते विक्री केंद्र वाहन व टॅक्सी वाहन वितरण समारंभ पार पडला. यावेळी आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.

यावेळी बोलताना आमदार देशमुख म्हणाले, “निवडणुकीच्या काळात मतदारसंघातील तरुणांच्या हाताला काम देण्याचे मी अभिवचन दिले होते. आज ते वचन पाळण्याची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मतदारसंघातील शंभर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे ३५ टक्के शासन अनुदान मिळणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “कीर्ती वाहक केंद्र आणि टॅक्सीवान योजनेला मंजुरी मिळाली असून राष्ट्रीयकृत बँकेकडून या प्रकरणांना कर्ज मंजूर झाले आहे. यामुळे अनेक तरुणांना स्वावलंबनाचा मार्ग खुला झाला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना आता गावात राहूनच स्वतःचा रोजगार मिळेल आणि कुटुंबालाही आर्थिक आधार मिळणार आहे.”

देशमुख यांनी सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना तरुणांच्या हितासाठी राबवल्या आहेत. केंद्र सरकारने जीएसटी कपातीचा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला असून भविष्यातही अशाच उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.”

या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य के.डी. पाटील, रणजीतसिंग नाईक, सुखदेव पाटील, सम्राटसिंह शिंदे, भाजप मंडळ अध्यक्ष कुलदीप निकम, शिवाजी गायकवाड, अरविंद शिंदे, सचिन गांधी, विशाल जाधव, संतोष इंगवले, नथुराम सावंत, प्रवीण गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते, लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments