दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी भिमराव पाटील (वय ७४, रा. आष्टा) हे सकाळी रोडकडेने चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येऊन बोलण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले आणि अचानक गळ्यातील सोन्याचा गोप हिसका मारून जबरी चोरी करून पळून गेले होते. या घटनेची नोंद आष्टा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस कारवाईचे आदेश दिले.
या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगलीवाडी टोलनाका परिसरात तीन इसम चोरीचे दागिने विक्रीसाठी येणार आहेत.
त्यांची अंगझडती घेतली असता प्रेम कांबळे याच्याकडून सोन्याचा गोप मिळून आला. विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्यांनी तिघांनी मिळून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी–माळेवाडी रस्त्यावर चालत असलेल्या वयोवृद्ध इसमाकडून सोन्याचा गोप हिसका मारून चोरी केली.
सदर सोन्याचा गोप आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून तीनही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोहेकॉ संदीप गुरव, पोहेकॉ सूरज थोरात आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

0 Comments