मिरजेतील वार्ड क्रमांक सहा मध्ये येणाऱ्या 2025 च्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिका निवडणुकीत डॉ. नर्गिस सय्यद यांच्या पुन्हा चांगल्या मताधिक्याने निवडून येण्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
डॉ. नर्गिस सय्यद यांनी मागील निवडणुकीत समाजसेवा व प्रभावी कामगिरीच्या जोरावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. स्थानिक पातळीवर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे तसेच मिरज महानगरपालिका रुग्णालयात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभर बेड मंजूर करण्यात त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
मिरज शहरात त्यांच्या या कार्याची सर्वत्र चर्चा असून वार्ड क्रमांक सहा मधील मतदार पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, डॉ. नर्गिस सय्यद हे आमदार जयंत पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते पुन्हा उमेदवारी मिळवून विजयी होतील, अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत आहे.

0 Comments