तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील तंटामुक्त अध्यक्षपदी नुकतीच अरुणा डोंगरे यांची निवड करण्यात आली. यापूर्वी या पदावर चैतराम रोडगे कार्यरत होते. मात्र त्यानंतर हे पद रिक्त झाल्याने नव्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया घेण्यात आली.
या निवड प्रक्रियेत अरुणा डोंगरे यांचा एकमताने तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आला. अरुणा डोंगरे या यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच तसेच सदस्य पदावरही कार्यरत राहिलेल्या आहेत. सामाजिक कामाचा अनुभव आणि ग्रामविकासाची जाण लक्षात घेऊन त्यांची या जबाबदारीसाठी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामपंचायत सरपंच प्रतिमा जैतवार, उपसरपंच देवेंद्र मंडपे, पोलीस पाटील महेंद्र डोंगरे यांनी अभिनंदन केले असून, गावातील नागरिकांनीही त्यांचे स्वागत केले आहे.

0 Comments