Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

अपघातातून थोडक्यात बचावले खासदार डॉ. पडोळे − नागपूर बायपासवर उमरेड फाट्याजवळ पहाटेची घटना

  उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली. खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्युनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.


घटनेच्या वेळी वाहनात खासदार स्वतः उपस्थित होते. दिल्ली येथे उपराष्ट्रपती पदाकरिता मतदान करून ते विमानाने मुंबईला पाेहचले. तेथे कार्यालयीन काम पूर्ण केल्यानंतर आपल्या वाहनाने भंडाऱ्याकडे परतत होते. तेव्हा नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे संतुलन बिघडले आणि जोरदार धडक बसली. अपघात गंभीर असला तरी डॉ. प्रशांत पडोळे हे वाहनातून प्रवास करीत असलेले सहकारी सुखरूप आहेत. घटनेची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बराचसा भाग नक्षलप्रभावित आहे. अशा परिस्थितीत खासदारांना अद्याप शासकीय सुरक्षा व्यवस्था न देणे ही मोठी शोकांतिका असल्याची भावना व्यक्त होत आहे. भाजप सरकारकडे वारंवार मागणी करूनही सुरक्षा न मिळाल्याने या अपघातानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 सरकारला आता तरी जाग येईल का? असा सवाल कॉंग्रेस कार्यकत्यांनी केला आहे.  या अपघातानंतर प्रशासनाने बोध घेउन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील दौ-यात पुलिस सुरक्षा बळकट करण्याचे आवाहन जनतेतून होत आहे.

अपघातानंतर स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. वाहन रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. खासदार डॉ. पडोळे यांच्या जखमा सौम्य असल्याने त्यांना तातडीने उपचार देण्यात आले

Post a Comment

0 Comments