Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

तिरोडा येथे ईद-ए-मिलाद-उन-नबी कार्यक्रम उत्साहात..!

गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा येथे जश्ने ईद-ए-मिलाद-उन-नबी या पवित्र पर्वानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तिरोडा यांच्या वतीने अल्पोहार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास युवा नेते श्री. रविकांत बोपचे यांनी प्रमुखतेने सहभागी होत मुस्लिम समाज बांधवांना ईद मुबारक च्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी इस्लाम धर्मप्रेषित पैगंबर मोहम्मद पैगंबरांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन समाजात बंधुता, ऐक्य आणि शांततेचा संदेश पसरविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात उपस्थितांना ईद मुबारक देत अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. 

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तिरोडा येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पोलीस स्टेशनसमोर आयोजित या कार्यक्रमाला प्रामुख्याने,  रविकांत बोपचे यांच्यासह, मेघा बिसेन, कैलाश पटले, नासिर घाणीवाला संजय धुर्वे, भाग्यश्री केलवतकर, आशिष येरपुडे, रजनीकांत शरणागत, विजय बुद्धे, मंगेश गेडाम, अमोल जाऊळकर, मंगेश हिरापुरे, राजेश गोटफोडे, जॉनी सैय्यद, टिपू सैय्यद, उषाताई शामकुल, उमाशंकर पटले, सरपंच रविंद्र भगत, सरपंच रंजित वालदे, सरपंच मंदा टेंभरे, किशोर कुंभरे, बालक कुंभरे, राजेंद्र पटले, डीलेश बिसेन, शुभम गुप्ता, रिता नारनवरे, अमन नारनवरे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments