Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

विविध उपक्रमांनी मेरिटोरियस स्कूलमध्ये शिक्षक दिन जल्लोषात साजरा

समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची – मुकेश अग्रवाल


गोंदिया –  जिल्ह्यातील तिरोडा येथील मेरिटोरियस स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन व आयोजन शाळेच्या 10वीतील विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी आपले मार्गदर्शक असलेल्या शिक्षकांचा शुभेच्छा पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी शिक्षाकांसाठी नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनी च्या नृत्य, गायन, वक्तृत्व अशा सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगतदार झाले. शिक्षकांचा गौरव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी खास सादरीकरणही केले.

संस्थेकडून गेल्या 3 वर्षे व 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या निष्ठावान सेवेमुळे संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

तसेच संस्थेच्या वतीने एम टी डी सी, बोदलकसा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात पर्यावरणपूरक संदेशासोबत सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. शिक्षक यानी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

या वेळी प्रमुख पाहुणे मुकेश अग्रवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “समाज घडविण्यात शिक्षकांची भूमिका अतिशय मोलाची आहे. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देतात.”

कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका रानी अग्रवाल, प्राचार्य प्रफुल्ल तिवारी यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थिनी व शिक्षकांच्या संयुक्त प्रयत्नातून झाले.


Post a Comment

0 Comments