गोंदिया:- जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तिरोडा, च्या वतीने आयोजीत राष्ट्रीय विज्ञान नाट्य व कला उत्सव तालुका स्तरीय स्पर्धा दिनांक 2 सप्टेंबरला स्थानिक मेरीटोरियस पब्लिक स्कूल तिरोडा येथे आयोजित करण्यात आली होती.
यात असीम सराफ पब्लिक स्कूल तिरोडा येथील इयत्ता 9 वी ची विद्यार्थीनी मृणाली पवन वासनिक हिने एकल नृत्य प्रकारात (भरत नाट्यम) तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मृणाली ने आपल्या यशाचे श्रेय आई अँड. सुप्रिया वासनिक, वडील पवन वासनिक, स्कूल च्या प्राचार्या वर्षा सोनी, वर्ग शिक्षक विनोद टेंभरे, आणि शाळेचे शिक्षक, शिक्षिका यांना दिलेले आहे.
तिच्या या चमकदार कामगिरी बद्दल तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार दिलीप बनसोड, पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण, जी. प. सदस्या माधुरीताई रहांगडाले, न. प. माझी सदस्य अशोक असाटी, लायन्स क्लब तिरोडा पॉवर सिटी अध्यक्ष डॉ. योगेंद्र भगत, डॉ. संदीप मेश्राम, अँड. अजय यादव आदींनी तिचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे…

0 Comments