Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

काळी मैना एवढाच महिना तरी विक्रेत्यांची दैना


सध्या बाजारात महागड्या फळांच्या स्टॉलपेक्षा  गावोगावी, शहरोशहरी विकायला येणाऱ्या रानमेव्याकडे प्रकर्षाने लक्ष जात आहे . रानावनातून मजल - दरमजल करीत करंवंद, जांभूळ, तुती, अळू आदी काटेरी वनस्पतींशी दोन हात करून चार पैसे पदरी बांधता येतील, या आशेने शाहूवाडी, पन्हाळा या डोंगर भागातील खऱ्या अर्थाने" वन" वासी असणारे विक्रेते सध्या ग्रामीण आणि शहरी वस्त्यांकडे हा रानमेवा विकत असताना दिसत आहेत . करवंदांची आंबट गोड चव, जांभळाचा रसभरीत आस्वाद, काहीशी तुरट आणि बरीच आंबट असणारी तुती तसेच जिभेवर विरघळणारे आणि खाताना त्यातील लज्जत चाखताना डोळे मिटावयास लावणारा अळू खवैय्यांना खाण्यातील स्वर्गसुख देतो यात शंका नाही  असे असले तरी या रानमेव्यांची किंमत सध्या सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी दिसत नाही . करवंदाचे दहा रुपयास एक माप आणि देशी जांभूळ साठ रुपये पावकिलो आणि मोठ्या आकाराची जांभळे शंभर रुपये पावकिलो दराने विकले जात आहेत . जांभूळ घ्या जांभूळ.... आणि डोंगरची काळी  मैना आता एवढाच महिना. अशी साद ऐकू आल्यानंतर खाण्याची इच्छा होते मात्र जीभेचे चोचले पुरवण्यासाठी हात आखडता घ्यावा लागत आहे . यासंदर्भात विक्रेत्यांशी संपर्क साधला असता मुबलक रानमेव्यासाठी एप्रिलमध्ये वळवाच्या सरी पडाव्या लागतात तसा जोरदार पाऊस डोंगरमाथ्यावर न झाल्याने रानमेवा मिळवणे आणि त्यासाठी पूर्ण दिवस वाया जाणे या प्रक्रिया असतात . नैसर्गिक अधिवासात देशी वाणाची जांभळे सापडतात पण त्यासाठी खूप कष्टदायी प्रक्रिया आहे . करवंद तोडताना त्याचा चिक हाताला लागल्यानंतर आणि पूर्ण काळीभोर करवंदे टोपलीत घालताना खूप यातायात करावी लागते . ग्राहकांच्या शोधात गावोगावी भटकंती करताना दराची घासाघीस सहन करून आणि प्रवाशी वाहतुकीची झळ सोसून खूप कमी पैसे गाठीला रहातात याची ग्राहक दखल घेत नाहीत आता एक वळवाचा पाऊस झालाय तरीही उत्पन्न आणि विक्री याचा ताळमेळ पहाता श्रमाची किंमत मिळत नाही अशी खंत व्यक्त केली . सिझनमधील आंब्यांना हवा तो दर देणारे ग्राहक रानमेव्यासाठी मात्र घासाघीस करतात हे विसंगत चित्र नैसर्गिक अधिवासातील काळ्या मैनेस लाभदायी ठरताना दिसत नाही एवढे नक्की . 

Post a Comment

0 Comments