गोंदिया:- तिरोडा तालुक्यातील घोगरा येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने 14 एफिल ला महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी 7 वाजता मुन्ना बडगे यांच्या अध्यक्षस्थेतेखाली चंद्रहास भांडारकर पोलीस पाटील यांनी महामानवाला माल्यार्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर केक कापून लहान मुलांसह मोठ्यांनी देखील आनंद साजरा केला गेला.
यावेळी गावात भीम रैली डिजे च्या तालावर भीम अनुयायांनी नाचुन आनंद साजरा केला . डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो ,बोलो जय जय भीम असा जयघोष रैलीतुन केला गेला. मोठ्या संख्येने रैलीत भीम अनुयायीसह गावातील नागरिक सहभागी झाले होते.
0 Comments