महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आज भारतीय संविधानामुळे भारत देशाची उंची जगात वाढली आहे. त्यामुळे भारत देशाला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची गरज असल्याचे प्रतिपादन माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी विटा येथे बोलताना केले.
भारतीय जनता पार्टी आणि फकीरा पॅंथर सेनेच्यावतीने विटा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मान सन्मानाचा सोहळा माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सन्मान शाल फेटा आणि मानचिन्ह देऊन माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थितांना लाडू आणि जिलेबीचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा फकीरा पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप ठोंबरे, भाजपचे सांगली जिल्हा सचिव पंकज दबडे, फकीरा पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिकेत साळुंखे, विक्रम कदम, स्वप्निल बनसोडे, दाजी पवार आचार्य संतोष यादव, निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments