सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा कराड रोडवरील न्यू चिकन सेंटर बाजूस व असाणाऱ्या शेळ्यांचा जनावरांचा गोठा आहे व बाजूस पत्र्याचे छप्पर प्रमाणे शेंड आहे. व शेडच्या बाजूस मोकळ्या शेत जागेत गवत व वाळके लाकडे सह अन्य साहित्य ठेवले होते.
गोठ्याच्या पाठिमागून अचानक सकाळीह १०/३० च्या सुमारास आग लागली या आगीने वारे सुटल्याने अचानक रुद्ररुप धारण केले. बघता बघता मोकळ्या मैदानावरील वाळलेल्या गवताने व लाकडाने पेट घेतल्याने अक्षरशः धुराचे लोट आगीने रौद्ररूप धारण केले. अचानकच त्या परिसरात पेठ घेतल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी विटा नगरपालिका अग्निशामक दलास दूरध्वनी वरून याची माहिती दिली. ही माहिती दिल्यानंतर अग्निशामक चे जवान गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. अचानक पेट घेतलेल्या गोठ्यातून नागरिक व पोलिसांच्या मदतीने तातडीने गोठ्यामध्ये असणारे 50 ते 60 शेळ्या बाहेर काढल्या अन्यथा मोठा अनर्थ त्या ठिकाणी घडला असता मुख्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला असता. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी जनावरांचे खाद्य व अन्य साहित्य खात झाले.सदर हा गोठा गायकवाड या नामक व्यक्तीचा असल्याचे घटनास्थळी नागरिकातून चर्चा होत होती. वेळेत अग्निशामक दल आल्याने मोठा अनाथ टळला . विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिक व पोलिसांच्या मदतीने अग्निशामक दलास मदत करून आग आटोक्यात आणली.
0 Comments