मिरज शहरात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे एक मोठा अपघात टळला. हिंदू एकता चौकात जिओ फायबर कंपनीच्या डांब वायरचा तुटलेला भाग थेट एका रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सदर वायर फायबर ऑप्टिकची असून ती जिओ फायबर कंपनीच्या मालकीची असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, अशा डांब वायरची परवानगी कोणत्या तत्वावर देण्यात आली होती? सार्वजनिक ठिकाणी वायरिंग करताना सुरक्षेचे निकष पाळले गेले होते का?
स्थानिक नागरिकांच्या मते, या प्रकारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली असून, संबंधित इंटरनेट कंपनीकडून अहवाल मागविण्यात आला आहे. शहरातील वायर व्यवस्थापनाचा संपूर्ण आढावा घेऊन भविष्यातील धोके टाळण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
0 Comments