Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

फडणवीसांना 'गोकुळबद्दल' काही माहिती नाही..." : डोंगळेंच्या बंडाला हवा दिल्याने मुश्रीफ प्रचंड संतापले!

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुण डोंगळे यांना सांगण्याऐवजी, मी महायुतीचा घटक आहे. मला सांगायला हवं होतं. शिवाय डोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांना एकच बाजू सांगितली आहे.मात्र मुख्यमंत्र्यांना गोकुळबाबत काही माहिती नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार आम्ही मुंबईत आहे. आम्ही त्यांना भूमिका समजावून सांगू, असं म्हणत फडणवीस यांनी गोकुळ दूध संघाच्या राजकारणात केलेल्या हस्तक्षेपावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे.दोन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये गोकुळ अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल (15 मे) संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच डोंगळे यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत राजीनामा न देण्याविषयी आपल्याला सूचना असल्याचे सांगत डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.डोंगळे यांनी कालच्या संचालक मंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली. माझा अध्यक्षपदासाठी आग्रह नाही. मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी दोन्ही नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका अशा सूचना मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून दिल्या आहेत, त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सगळ्या घडामोडींमागे भाजप नेते धनंजय महाडिक असल्याच्या चर्चा आहेत. त्यांनीच डोंगळे यांना राजीनामा देण्यासाठी तयार केले असल्याचे सांगितले जाते.पण मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये काँग्रेस नेते, आमदार सतेज पाटील यांचीच साथ देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे मुश्रीफ-पाटील मैत्री कायम राहिली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बोलताना मुश्रीफ यांनी डोंगळे यांच्यावर ताशेरे ओढले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही नाजारी व्यक्त केली.मुश्रीफ म्हणाले, अरुण डोंगळे यांनी 15 मे रोजी राजीनामा देतो असे सांगितले होते. पण त्यांनी अचानक भूमिका बदलली. राजीनामा देण्याच्या वेळी तो न देणे हाच आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. पण मी डोंगळे यांना आजही विनंती करतो की त्यांनी राजीनामा द्यावा. पुढचा अध्यक्ष कोण करावा हे आम्ही सर्व नेते मंडळी ठरवणार आहोत. शिवाय आज जिल्ह्यातील सर्व नेत्यांची गोकुळ संदर्भात बैठक आहे, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.मी महायुतीचा घटक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंगळे यांना सांगण्याऐवजी, मला सांगायला हवं होतं. शिवाय डोंगळे यांनी एकच भूमिका सांगितली आहे. मुख्यमंत्र्यांना गोकुळ दूध संघाबाबत काही माहिती नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार आम्ही मुंबईत आहे. आम्ही त्यांना भूमिका समजावून सांगू. गोकुळ मध्ये राजकारण येऊ नये हीच आमची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला राजकारण करण्यास वेळ आहे. तिथे महायुतीची ताकद आपण दाखवू, युतीचा महापौर कसा होईल याकडे लक्ष देऊ, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला.


Post a Comment

0 Comments