मुदखेड तालुक्यातील मौजे पिंपळकौठा मगरे येथे दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ईद मिलाप व मस्जिद परिचय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गावातील सर्वधर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित धर्मगुरूंनी मस्जिद आणि मुस्लिम प्रार्थना पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच ईद मिलाप कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
आजच्या काळात वाढत्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर परस्परांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याची गरज आहे. भारत हा विविध जाती, धर्म, पंथ आणि परंपरांचा संगम असलेला देश आहे. त्यामुळे सांप्रदायिक सौहार्द जोपासण्यासाठी प्रत्येक धर्माची योग्य माहिती असणे अत्यावश्यक आहे. अनेकांना मुस्लिम धर्मातील प्रार्थना पद्धती, मस्जिदमध्ये काय चालते याबाबत उत्सुकता असते. याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुस्लिम धर्मगुरूंनी समाजासमोर खरी माहिती मांडली.
या उपक्रमामुळे विविध समाजातील बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत झाली. एकोपा, जातीय सलोखा आणि परस्पर प्रेम वृद्धिंगत करण्याच्या मौल्यवान उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाने सर्वधर्मसमभावाचा सुंदर संदेश दिला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मस्जिद कमिटी आणि गावातील सर्व मुस्लिम बांधवांनी विशेष मेहनत घेतली. सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जावेत, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
#EidMilap #सामाजिकऐक्य #मस्जिदपरिचय #PeaceAndUnity #Brotherhood #Mudkhed #Maharashtra
0 Comments