सांगली महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी नागरिक संवाद व तक्रार निवारण मोहीम राबविण्यात येत आहे. प्रभाग समितीनिहाय दर बुधवार तसेच मुख्यालय पातळीवर दर गुरुवारी आयोजित होणाऱ्या या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज, दिनांक ३ एप्रिल २०२५, रोजी सांगली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त मा. रविकांत अडसूळ यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद तक्रार निवारण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या विशेष मोहिमेदरम्यान ४१ तक्रारींची नोंद करण्यात आली, त्यापैकी १२ तक्रारी महिला तक्रारदारांनी मांडल्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही आपल्या समस्या मांडल्या. १५ तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या, तर उर्वरित तक्रारींचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले.
🔹 नागरिकांकडून नोंदवलेल्या प्रमुख तक्रारी –
✔ स्वच्छता आणि घंटागाडी वेळेवर न येणे
✔ भटकी कुत्री आणि कचऱ्याची समस्या
✔ अपुरा पाणीपुरवठा आणि लाईट बंद असणे
✔ नगररचना आणि बांधकाम परवानग्यांशी संबंधित समस्या
✔ शिक्षण विभागातील प्रलंबित पेन्शन व उपदान प्रकरणे
✔ गृहनिर्माण आणि करआकारणीशी संबंधित तक्रारी
याशिवाय, सामाजिक कार्यकर्ते, संस्था व एनजीओंनी सहभाग नोंदवत विकासाभिमुख मागण्या मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणे, तसेच नवीन उद्यानांची उभारणी यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यावेळी आयुक्त मा. रविकांत अडसूळ यांनी सांगितले की, "प्रत्येक अधिकाऱ्याने नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत त्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे. समस्यांचे निराकरण करणे ही आपल्या जबाबदारीची बाब आहे."
सांगली महापालिकेच्या वतीने दर बुधवार प्रभागस्तरीय तर दर गुरुवार मुख्यालय पातळीवर तक्रार निवारण मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
#SangliMunicipalCorporation #CitizenGrievance #PublicDialogue #ComplaintResolution #SangliNews #MunicipalInitiative #RavikantAdsul
0 Comments