Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा नाशिकमध्ये तीव्र निषेध; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलन

 

नाशिक – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी नाशिक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान सरकारने हल्लेखोर आतंकवाद्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी, पर्यटकांना त्वरित संरक्षण द्यावे आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

या निदर्शनांमध्ये पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ. सिताराम ठोंबरे, कॉ. तानाजी जायभावे, कॉ. देविदास आडोळे, शहर सचिव मंडळ सदस्य कॉ. डॉ. मिलिंद वाघ, कॉ. सचिन मालेगावकर, कॉ. संतोष काकडे, कॉ. तुकाराम सोनजे, कॉ. सतीश खैरनार, कॉ. अरविंद शहापुरे, कॉ. मोहन जाधव, कॉ. स्वरूप वाघ, कॉ. संतोष कुलकर्णी, कॉ. दत्ता राक्षे, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. भीवाजी भावले, कॉ. विजया टिकल, कॉ. शरद बोराडे, कॉ. प्रमिला सोनवणे आणि कॉ. सारिका पवार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी आंदोलकांनी "हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे", "पर्यटक सुरक्षेसाठी सरकार गंभीर व्हावे" अशा घोषणा देत निषेध नोंदवला.

N24 मराठी न्यूजचे प्रतिनिधी पांडुरंग बिरार –  सुरगाणा-पेठ, नाशिक.

Post a Comment

0 Comments