मुंबई – निवडणुकीपूर्वी महायुतीकडून दिल्या गेलेल्या ‘मोफत वीज’च्या गाजलेल्या घोषणेला आता पूर्णतः पोकळ ठरवत, राज्यात वीज थकबाकीचा आकडा थेट १ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वीज वितरण कंपनी 'महावितरण' समोर वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, ‘मोफत’ वीज मिळेल या आशेने अनेकांनी वीजबिल भरलेच नाही.
या घोषणांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि वीजबिल न भरल्याने थकबाकी वाढत गेली. कृषीपंपांचे सुमारे ७५ हजार कोटी रुपये थकले आहेत. महावितरणकडे निधी कमी असून, सवलती दिल्यावर वीजपुरवठा टिकवणे अधिक कठीण झाले आहे.
राजकीय नेत्यांच्या फक्त घोषणांवर विश्वास ठेवून वीज वापरकर्त्यांनी वीजबिलांची जबाबदारी टाळली आणि परिणामी संपूर्ण राज्याला वीजपुरवठ्याच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही घरगुती ग्राहकाला ‘मोफत वीज’ अद्याप मिळालेली नाही, ही बाब स्वतः शासनाच्या अहवालांमधून स्पष्ट झाली आहे.
0 Comments