राहुरी फॅक्टरी येथील एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात धामोरी येथील सात जणांविरुद्ध घरत घुसून विनयभंगासह मारहाण केल्या प्करकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, आमचे सन २०२३ साली अहिल्यानगर ते शिर्डी हायवे रोडवरील धामोरी फाट्याजवळ आम्ही चहाची टपरी टाकलेली होती. त्यावेळी आमच्या चहाचे टपरीवर अरुण उगले रा. धामोरी ता. राहुरी हा कधीतरी चहा घेण्यासाठी येत होता. त्यामुळे आम्ही त्यास ओळखत होतो, त्यावेळेसच अरुण उगले यांची पत्नी हीचा पती व माझ्या पत्नीचे अफेयर आहे. असा संशय घेतला होता. त्यावेळी मी अरुण उगले यांची पत्नी हीस आपण समोरा समोर चर्चा करु असे म्हणालो असता तिने काही गरज नाही असे सांगितले होते. त्यामुळे आम्ही आमची चहाची टपरी आम्ही सुमारे मागील एक वर्षापासुन बंद केली होती. १ एप्रिल रोजी अरुण उगले व त्याचा मिञ हा काल त्याचा मित्र सुरेश चव्हाण यांना भेटण्यासाठी आले होते. त्याबाबत अरुण उगले याच्या पत्नीस तिचा पती काल राहुरी फॅक्टरी येथे आला होता हे माहीत झाले होते.
२ एप्रिल रोजी जेवण करुन आम्हांला गावाला जायचे होते. त्यामुळे मी घरासमोरील लावलेली फोरव्हीलर गाडी पुसत असताना तेथे अचनाक अरुण उगले यांची पत्नी, अरुण उगले यांची मुलगी ,अरुण उगले यांची सासु ,प्रदिप जाधव (पूर्ण नाव व गाव माहीत नाही) व इतर तीन जण आले. त्यावेळी त्यातील अरुण उगले यांची पत्नी मला म्हणाली की, तुमची बायको कोठे आहे. तिला मला भेटायचे आहे. असे म्हणाले असता मी त्यांना म्हणालो की, घरात आहे. जा घरात असे म्हणून ते सर्वजण घरात गेले व माझी पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे मी घरात पळत गेलो त्यावेळी अरुण उगले यांची पत्नी, मुलगी हया सुरेखा हिस शिवीगाळ करत लाथाबुक्यानी मारहाण करीत होत्या व प्रदिप जाधव यांने माझी पत्नीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्याच्या बरोबर आलेले इतर तीन लोकांनी तिचे केस धरुन व लाथाबुक्यानी मारहाण केली आहे. त्यावेळी मी त्यांना माझ्या पत्नीला सोडा तुम्हाला काय बोलायचे ते माझ्याशी बोला असे म्हणालो असता त्यातील प्रदिप जाधव याने त्याचे हातातील लोखंडी कत्ती माझ्या डोक्यात मारली. त्यामुळे मी खाली पडलो. तरी देखील मला शिवीगाळ करत लाथांबुक्यानी मारहाण करीत होते. आमची आरडा ओरड एकुन आमचे शेजारी राहणारी महिलेने पळत येऊन आमची सोडवा सोडव केली. त्यानंतर परत जात असताना प्रदिप जाधव व त्याचे बरोबर आलेले तीन अनोळखी इसम म्हणाले की, तुला उद्या बघुन घेतो, तुम्हांला काय करायचे ते करा असे म्हणुन तुम्ही परत आमच्या नादी लागले तर तुम्हांला जिवच मारुन टाकु अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर भांडणामध्ये माझ्या पत्नीचे गळ्यांतील सोन्याची पॅन्डल तुटुन गहाळ झाले असल्याचे म्हंटले आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके हे करीत असुन अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

0 Comments