Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

रुग्णालयाचा हलगर्जीपणा जुळ्या बाळांचा जन्म ,पण मायेची सावली हिरावली


धर्मदाय हास्पिटल मध्ये उपचारासाठी 10 लाखाची मागणी.           

योग्य वेळी उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू.

पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने उपचारासाठी तातडीने दहा लाख रुपये जमा करण्यासाठी मागितल्याने एका गर्भवती महिलेला योग्य वेळी उपचार मिळाला नाही आणि त्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरख यांनी केलाय.धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्दैवी घटना भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी मोनाली भिसे यांच्या सोबत घडली आहे.

मोनाली भिसे या गर्भवती असल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर या धर्मदाय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र हॉस्पिटलने उपचार करण्यापूर्वी कुटुंबीयाकडे दहा लाख रुपये जमा करण्याची मागणी केली.मात्र कुटुंबाने फक्त तीनच लाख रुपये आता आम्ही जमा करू शकतो असं सांगितल्यानंतर.दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने गर्भवती मोनाली भिसे यांच्यावर उपचार नाकारून दुसऱ्या हॉस्पिटल पाठविले त्यांना उपचार मिळण्यात झालेल्या दिरंगाई मुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला.दीनानाथ हॉस्पिटल संदर्भात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या संदर्भात येत्या अधिवेशनात मी प्रश्न उपस्थित करणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी. अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे.





Post a Comment

0 Comments