सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा नेवरी रस्त्यावरील विटा पुसेसावळी रोडवर चारचाकी व कटनेरचा भीषण अपघात झालय
सविस्तर घटनास्थळावरून मिळालेली नागरीकातून माहिती अशी की सदर खेराडे इथे काही कामानिमित्त आपल्या मामाची चारचाकी गाडी घेऊन भाचा प्रशांत फले वय वर्षे २० रहाणार भिकवडी खुर्द.तालुका कडेगांव रात्रीच्या वेळेत गेला होता. काम आटपून तो पुन्हा गावी परत चारचाकी गाडीतून जात असताना विटा पुसेसावळी रोडवर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या कंटनेर या गाडीला जोरदार समोरासमोर या चारचाकी गाडीची रात्री धडक झाल्याने या धडकेत प्रशांत फले हा तरुण जागीच ठार झाला. तर चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला. हा अपघात रात्री १२ ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडला असल्याची माहिती घटनास्थळी मिळाली. अक्षरशः प्रशांत हा आपल्या गावी भिकवडी खुर्द या गावी रथ उत्सव व सासनकाठी यात्रे दिवशी होती या दिवशी दिवसभर देवाच्या कार्यात मग्न होता.
सर्व मित्रमंडळींच्या बरोबर गुलालात दंग होता. रात्री काय घडलं ते प्रशांतने आपल्या गावची यात्रा ही शेवटचीच बघितली. की काय? अशी चर्चा ही घटनास्थळी नागरीकातून होत होती. प्रशांत हा सर्वांशी मनमिळावू स्वभावामुळे सर्वांच्या परिचयाचा व मित्रांन बरोबर कायम असायचा तर कोणत्याही चारचाकी गाडीवर बदली ड्रायव्हर म्हणून जायाचा. शिवाय ट्रॅक्टर वरतीही चालक म्हणून दिवस-रात्र काबड कष्ट काम करायचा. लहानपणीच आई-वडिलांचा डोक्यावरील हात दूरावाला आणि आजी आजोबा यांनी प्रशांतला पोटच्या मुलाप्रमाणे या बाळाला चांगले लहानपणापासून जपले आजी आजोबांचा फार लाडका झाला होता. दुपारी कुटुंबाबरोबर देवदर्शन करून तो रात्री मामाची गाडी घेऊन खेराडे या गावी गेला आणि माघारी येत असताना. त्याच गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातात प्रशांत हा जागीच ठार झाला तर गाडीचा पुढील पूर्ण भागाचा चक्काचूर झाला. हा अपघात रात्री बारा ते सव्वा बारा च्या दरम्यान घडला. अपघाताच्या घटनास्थळी ते दृश्य अपघाताचे पाहिल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांनी हंबरडाच फोडला. सकाळी सर्वांशी यात्रेमध्ये खेळणारा बागडणारा सर्वांच्या बर गप्पा मारणारा गुलालात दंग होणारा प्रशांत एका रात्रीत नाहीसा झाला आणि सगळ्यांना सगळ्या परिवारांना मित्रपरिवारांना आजी आजोबांना मोठा धक्काच बसला. वयाच्या विसाव्या वर्षात प्रशांत हा तरुण सगळ्या कुटुंबातून निघून गेल्याने आजी आजोबांना धक्का बसलास पण मित्र परिवाराने मात्र. एकच आक्रोश केला भावा कार इतक्या लवकर गेलास..काय चुकलं आमचे असे म्हणत अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले
0 Comments