भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार, तसेच माजी पालकमंत्री आ. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडळ अध्यक्ष पदाच्या निवडणुका रविवार, दि. २० एप्रिल २०२५ रोजी डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकमताने आणि खेळीमेळीत पार पडल्या.
या निवडणुकीत खालील मंडळ अध्यक्षांची निवड झाली:
-
मिरज शहर पूर्व: श्री. चैतन्य विलास भोकरे
-
मिरज शहर पश्चिम: सौ. अनिता अनिल हारगे
-
मिरज ग्रामीण दक्षिण: श्री. अभिजीत गौराजे
-
मिरज ग्रामीण उत्तर: श्री. मयुर विजय नाईकवाडे
या निवडीच्या वेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, युवानेते सुशांत (दादा) खाडे, विधानसभा निवडणूक प्रमुख काकासो धामणे, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्व नूतन अध्यक्षांचा सत्कार जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवानेते सुशांत खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विशेष म्हणजे, मिरज विधानसभा मतदारसंघाने ९२१ सक्रिय सदस्य नोंदणीचे लक्ष पार करत ९२७ सदस्य नोंदणी पूर्ण करत पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळवले आहे. यासाठी सक्रिय सदस्य नोंदणी प्रमुख आणि जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा सन्मानही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
0 Comments