प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गगनभेदी जयघोषात मुदखेड शहरात १७ एप्रिल रोजी जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शहरातील चौमुखी गणपती जवळील श्रीराम मंदिरात महाआरतीने झाली. त्यानंतर दुपारी भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली. संपूर्ण मार्ग भगव्या रंगात रंगला होता. घरोघरी रांगोळ्या काढून, पुष्पवृष्टी करून नागरिकांनी शोभायात्रेचे स्वागत केले.
शोभायात्रेत विशेष आकर्षण ठरले:
-
प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती व पालखी
-
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे सजीव देखावे
-
नांदेड येथील आकर्षक छत्री देखावा
-
महाकाल देखावा, बँड पथक, टाळ पथक
-
कांतारा आणि कालिमाता देखावा
-
ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यातर्फे 3D देखावे
शोभायात्रा चौधरी गल्ली, छत्रपती संभाजी नगर, कासार गल्ली, मठ गल्ली, पोलीस स्टेशन, गुजरी, मोंढा मैदान मार्गे जात विराट धर्मसभेत रूपांतरित झाली.
यावेळी माधव ब्लफेवाड, श्री अपरंपार मित्र परिवार (बजरंग चंद्रे), गुडमलवार परिवार, माजी नगराध्यक्ष राम चौधरी आणि आर्य वैश्य समाज यांच्यातर्फे महाप्रसाद व थंडपेयाची उत्तम सोय करण्यात आली होती.
धर्मसभेसाठी मुख्य वक्ते म्हणून बाबा सत्यनारायण मौर्य (इंदोर, मध्यप्रदेश) यांची उपस्थिती लाभली. याशिवाय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हनुमान चालीसा समिती व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकेश मामीडवार, सूत्रसंचालन संतोष सावंत तर आभार प्रदर्शन राजू बारतोंडे यांनी केले.
संपूर्ण शहरात या दिवशी धर्म, एकता आणि संस्कृतीचे दर्शन घडले. आयोजनकर्त्यांनी परिश्रमपूर्वक हा कार्यक्रम साजरा करून एक अभिमानास्पद परंपरा जपली.
0 Comments