सांगली – दरवर्षी २३ एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. युनेस्को अर्थात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना यांच्या वतीने वाचन, प्रकाशन आणि कॉपीराईट यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. भारतातही या दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, परिसंवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
या पार्श्वभूमीवर सांगलीतील नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय, शांतिनिकेतन यांच्या वतीने एक अभिनव उपक्रम "शांतिनिकेतन वाचन कट्टा" सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवणे, वाचक संख्येत वाढ करणे, वाचनाची गोडी निर्माण करणे तसेच साहित्यिक, लेखक व प्रकाशक यांचा गौरव करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमात ग्रंथालयाच्या समन्वयक साईकलाम कोरबु, कार्यवाह हर्षा बागल, ग्रंथपाल ज्योती मोहिते, लिपिक कोमल जाधव, दत्तात्रय वारे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथालयाच्या वतीने वाचकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments