Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

सडक अर्जुनीत बसला आग; २३ प्रवासी थोडक्यात बचावले, ट्रॅव्हल्स जळून खाक

 

गोंदिया जिल्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गवरील सौदड गावात एका खाजगी प्रवाशी बस ला शॉट शर्किट मुळे आग लागली सुदैवाने बस मध्ये बसलेले 23 प्रवाशी सुखरूप बचावले.वाहन चालकाला आग लागल्याची माहिती होताच त्याने , ट्रॅव्हल थांबविली वाहणात बसलेले सर्व प्रवाशी लागलीच खाली उतरले कुणालाही दुखापत झाली तरी अनेक प्रवाश्यांचे मोबाइल आणि बॅग बस मधेच राहिले आग इतकी भीषण होती की संपूर्ण साहित्यासह बस जळून खाक झाली. 

सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील सौन्दड येथील उड्डाण पुलाच्या सर्विस रोड वर काल रात्री 08 वाजे दरम्यान हा थरार लोकांनी अनुभवाला 

यात ट्रॅव्हल्स संपूर्ण जळून खाक झाली, के.गिरी वाहन चालक यांनी दिलेल्या माहिती नुसार ही बस काँकेर रोडवेज कंपनीची ट्रॅव्हल्स असून वाहणात 23 प्रवाशी बसले होते, ही ट्रॅव्हल्स रायपूर वरून हेंद्राबाद ला जात होती, अश्यात वाहणाला आग लागल्याचे कळताच बस थांबविली आणि प्रवाश्यांना उतरवले, 

अश्यात कुठलीही जीवित हानी झाली नसून संपूर्ण साहित्य जाळले,प्रवाश्यांना दुसऱ्या बस मध्ये बसवून हेंद्राबाद ला पाठविण्यात आले .तर ही आग विझविण्यासाठी सडक अर्जुनी नगर पंचायत ची अग्निशमन गाडी आणी साकोली येथून अग्निशमन गाडी बोलविण्यात आले होती विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांनी देखील आग विजविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, घटना क्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती, ट्रॅव्हल्स चे टायर फुटल्याने दोन वेळा मोठा स्फोट झाला, पोलिसांनी मार्ग मोकळा केला असून वाहतुक सुरळीत करण्यात आली 


Post a Comment

0 Comments