मिरज शहरात काल सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आणाभाऊ साटे नगर भागात पावसामुळे मोठी झाडे कोसळून काही दुकानांच्या गाळ्यांवर पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाळ्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. शहरातील इतर भागातही झाडे कोसळण्याच्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाडे हटवण्याचे काम सुरू केले आहे. काही ठिकाणी रस्ते अडवले गेले असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
दरम्यान, जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही वेळ विज पुरवठा खंडित करण्यात आला होता. महावितरणकडून विजपुरवठा लवकरच पूर्ववत करण्यात आला.
शहरातील नागरिकांनी सोशल मीडियावरून पावसाचे फोटो व व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
0 Comments