पोलिस अधीक्षक सत्यजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक विशेष पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे नियोजन केले होते.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, कुंडल फाटा (ता. वाळवा, जि. सांगली) येथे एक इसम अग्निशस्त्रासह फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी किर्लोस्करवाडी रोडवर सापळा रचून सदर व्यक्तीला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याजवळ विचारपूस केली असता त्याने आपले नाव कुमार जनार्दन खेडी (वय ३१, रा. ताकरळी, ता. वाळवा) असे सांगितले. झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.
प्राथमिक तपासात पोलिसांनी निष्कर्ष काढला की, हे अग्निशस्त्र बेकायदेशीर असून, विवाद निर्माण करण्याच्या हेतूने बाळगण्यात आले होते. त्यामुळे आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे कुंडल येथे पुढील तपास सुरु असून आरोपीचा आणखी गुन्हेगारी इतिहास असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
0 Comments