कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती सहकारी साखर कारखान्यातील आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. क्रेनवर मापे घेत असताना तोल जाऊन पडल्याने एका २५ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीचे नाव छोटनकुमार ज्ञानदेव सहनी (वय २५), रा. थलभितीया, ता. मझौलिया, जि. चंपारण, बिहार असे आहे. तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भोगावती साखर कारखान्यात हेल्पर म्हणून कार्यरत होता.आज सकाळी सुमारे १२ वाजता, तो कारखान्यातील ऊस उचलणाऱ्या क्रेनवरून अंदाजे ४० फूट उंचावर मापे घेत असताना अचानक तोल जावून खाली पडला. ही घटना घडताच त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ प्रतिसाद देत त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला आगमनापूर्वी मृत घोषित केले.
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रसामुग्रीचा वापर करताना आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत घटनास्थळी उपस्थित काही वरिष्ठांनी व्यक्त केले आहे.
0 Comments