जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. हा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, संबंधित प्रकरणाने स्थानिक पातळीवर खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून परत येत असताना आरोपीने तिला फुस लावून विरळ भागात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितल्यानंतर तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित मुलीचे वैद्यकीय तपासणी करून तिला समुपदेशनाची मदत दिली जात आहे. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास सुरु असून, पुढील तपास न्यायालयीन मार्गाने सुरू राहणार आहे.
या प्रकरणाबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, अरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सोशल मीडियावर आणि गावकऱ्यांमध्ये होत आहे.
0 Comments