Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन, दहा दिवसांची हमी नंतर तीव्र इशारा!

 गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत मुल्ला येथील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात धान पिकासाठी आवश्यक वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी ठोस पावले उचलली आहेत. वारंवार विनंती करूनही वीजपुरवठ्यात अडथळे निर्माण होत असल्यामुळे, अखेर संतप्त शेतकऱ्यांनी रात्री 10 वाजता वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले.


या आंदोलनात जवळपास 100 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यांच्या मागण्या आणि व्यथा ऐकण्यासाठी आमदार संजय पुराम यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सविता पुराम यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती दर्शवली. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत त्यांना पाठींबा दिला.

दरम्यान, वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोड शेडिंगची समस्या तात्काळ सोडवून पुढील दहा दिवस पुरेसा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच, दहा दिवसांनंतर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची खात्रीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र, शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर दहा दिवसांनंतर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर संपूर्ण कुटुंबासह वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.



Post a Comment

0 Comments