काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय सुरक्षादलांवर भ्याड दहशतवादी हल्ला घडवण्यात आला. या घटनेत अनेक जवान शहीद झाले असून, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला.
शेख यांनी मिरज येथील प्रांत कार्यालयामार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करत तीन महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत.
त्यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.
या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) चा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारने जाहीर करावी.
जमीर शेख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांवर असे हल्ले निषेधार्ह आहेत. सरकारने या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, हीच देशवासियांची अपेक्षा आहे."
या मागणीला जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्याकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर तसेच विविध ठिकाणी निषेध सभा घेऊन आपला रोष व्यक्त केला आहे.
0 Comments