मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकीकरणाचा. दोन बंधूंची भेट, सॉफ्ट बॉडी लँग्वेज, आणि त्यांच्या भाषणातून येणारे संकेत यामुळे हे एकत्र येण्याचे गणित अधिकच मजबूत वाटू लागले आहे.
परंतु याच दरम्यान एक प्रश्नही उपस्थित होतोय – या एकतेच्या वाटचालीत अडथळा ठरणार आहेत का त्यांच्याभोवती फिरणारे बडवे आणि चमचेगिरी करणारे सल्लागार?
ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसांत मवाळ पावलं उचलली जात आहेत. एकत्र येण्यासाठी सकारात्मक संकेत दिले गेले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गत बैठकांमध्येही हा विषय चांगलाच चर्चेत असल्याची माहिती आहे.
मात्र मनसेतील काही जुने व प्रभावशाली नेते या विचाराला पाठिंबा देण्याऐवजी नकारात्मक सूर लावताना दिसत आहेत. “आपण स्वतंत्र पक्ष म्हणूनच वाढलो आहोत”, “शिवसेनेशी पुन्हा संधान म्हणजे विचारांशी तडजोड” असे सूर काही मनसे नेत्यांनी खाजगीत बोलताना लावल्याचे वृत्त आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, बंधूंची एकी होण्याची ही सुवर्णसंधी आहे. पण ही संधी त्यांच्याभोवतीचे बडवे गमावून टाकणार का, असा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.
या राजकीय हालचालींमुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्रात नवा समीकरण तयार होऊ शकतो. परंतु हे समीकरण प्रत्यक्षात येण्यासाठी "इगो" आणि "इनसिक्युरिटी" यांचा अडसर काढणं हेच खऱ्या अर्थाने कठीण काम आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, घाई करू नका, थोडी वाट पाहा
0 Comments