गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाटा येथे काल सायंकाळच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका महिलेचा आणि दोन बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासोबतच विजांचा कडकडाट देखील सुरू होता. याच दरम्यान, बिरसी फाटा येथील मंगला जितेंद्र बोरकर (वय ५० वर्षे) या महिला आपल्या बकऱ्यांना घेऊन घरी परतत असताना दुर्दैवाने त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यात मंगला बोरकर आणि त्यांच्या दोन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments