Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

जत तालुक्यातील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून सात मुलींचे लैंगिक शोषण; कठोर कारवाईची मागणी

 जत तालुक्यातील सनमडी येथील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून सात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधित मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

सुट्टीच्या दिवशी घरी गेल्यानंतर या मुलींनी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पालकांना दिली. त्यानंतर संतप्त पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली. मात्र, आता तक्रार मागे घेण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मुख्याध्यापकासह यामध्ये आणखी कोण दोषी आहेत का, याचीही तपासणी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, प्रदेश सचिव व माजी नगरसेविका सुवर्णाताई पाटील, असंघटित कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता साळुंखे, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमासे, वाळवा तालुकाध्यक्ष तैसीन आत्तार, प्रणिती हिंगलजे, सुनिता जगधने, तबसुम मुल्ला, चंपाताई कागे, कमलाताई चव्हाण, अर्चना सरोदे, उषा पाटील, श्वेता पडसलगे, शोभा ओमासे, सुशीला जाधव आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सदर शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशीही जोरदार मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments