Total Pageviews

NEWS

🖥️ सांगली जिल्ह्यातील शेती बातम्या "सांगली जिल्ह्यातील कापूस, ऊस, द्राक्षे यांच्या बाजारभावातील बदल" "जिल्ह्यातील पाऊस आणि पाण्यापुरवठा परिस्थितीविषयी अद्ययावत माहिती" "शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना किंवा नवीन तंत्रज्ञानाचा अंमल" सार्वजनिक आरोग्य आणि उपचार "मिरज-सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलची सुविधा आणि गरजा" "जिल्ह्यात मलेरिया/डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना" पर्यावरण आणि हवामान "कृष्णा नदीच्या पाण्याची सद्यस्थिती आणि धरणे" "उन्हाळ्यातील तापमानवाढीचा प्रभाव"

मिरज-बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते

मिरज-बोलवाड रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षणासाठी उभारल्या जाणाऱ्या भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते रविवार, दिनांक २७ रोजी सकाळी करण्यात आला.

या संरक्षक भिंतीसाठी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी तब्बल १ कोटी ९६ लाख ४० हजार रुपये निधी मंजूर करून आणला आहे. या ओढ्यावर संरक्षक भिंत बांधावी अशी नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. अखेर आ. खाडे यांनी या मागणीची दखल घेत कार्यवाही केल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

या बांधकामाच्या शुभारंभ सोहळ्यास सुरेश बापू आवटी, माजी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेविका बबिता मेंढे, माजी नगरसेवक करण जामदार, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे, संभाजी नाना मेंढे, रमेश मेंढे, आप्पा झांबरे, महेश धयारे, ज्योती कांबळे, अनिता हारगे, अनघा कुलकर्णी, उमेश हारगे, योगेंद्र थोरात तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संरक्षक भिंतीच्या बांधकामामुळे पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीपासून रस्ता व नागरिकांचे संरक्षण होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments