महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावल (प्रोटोकॉल व मार्केटिंग) आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा औपचारिक सत्कार केला.
यावेळी संस्थानच्या विविध योजना, सेवा व भक्तांसाठी चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती मंत्र्यांना देण्यात आली.
श्री साईंच्या चरणी दोन्ही मंत्र्यांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिर्डी परिसरात या मंत्र्यांच्या भेटीमुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments