कडाचीवाडी, चाकण – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या आणि SDA डान्स अकॅडमी, चाकणचा विद्यार्थी संग्राम सुरेश डाके याने अत्यंत गौरवप्राप्त असा 'नृत्य कालाभूषण बाल पुरस्कार 2025' मिळवून शाळेचे, गावाचे व कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे.
हा पुरस्कार कल्चर फाउंडेशन ऑफ इंडिया, नागपूर यांच्यावतीने देण्यात येतो. संग्रामच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्याची दखल घेत त्याला हा बहुमान देण्यात आला. या यशाबद्दल शाळा, डान्स क्लास, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी त्याचे विशेष सत्कार व अभिनंदन केले.
संग्राम डाके याचा एक मे 2025 रोजी शाळेमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, पालक, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार यांनी त्याचे जोरदार कौतुक केले. संग्रामने या संधीने प्रेरित होऊन पुढेही कला क्षेत्रात उच्च यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्याला पुढील वाटचालीसाठी अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments