नवी मुंबई | एका दलित महिलेसोबत घडलेला अमानुष हत्याचार आणि वैद्यकीय हलगर्जीपणामुळे तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेले डॉक्टर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. स्व. सौ. संगीता दिनेश खरात यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
या प्रकरणात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
1. दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी.
2. निलंबित व चौकशी सुरू असलेल्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे रद्द करून त्यांचे कायमस्वरूपी निलंबन करावे.
3. मनपा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय तज्ञ व शिकाऊ डॉक्टरांची माहिती देणारी पत्रके मुख्य ठिकाणी लावावी, जेणेकरून रुग्ण व नातेवाईकांना पारदर्शक माहिती मिळू शकेल.
4. नवी मुंबई महापालिका व समाजसेवक यांच्या समन्वयातून 'आरोग्य मित्र' समिती स्थापन करून वैद्यकीय सहायता कक्ष सुरु करावा.
5. महापालिका आयुक्तांनी विशेष दक्षता समिती नेमून मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टरांची चौकशी करून अहवाल कुटुंबीयांना द्यावा.
या मागण्यांमुळे वैद्यकीय यंत्रणेतील पारदर्शकता, जबाबदारी व दलित समाजावरील अन्याय थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व इतर कुणालाही अशा अमानुषतेचा सामना करावा लागू नये, यासाठी ही लढा सुरू आहे.
0 Comments