मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथून तीन दिवसाचे नवजात बाळ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली होती. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या ४८ तासांत बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आहे.
संबंधित महिलेने हॉस्पिटलमधून विश्वास संपादन करून बाळाला चोरले होते. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व अन्य तपशीलांच्या आधारे शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या कडून अधिक चौकशी सुरू आहे.
बाळाची प्रकृती स्थिर असून, ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. ही संपूर्ण घटना हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत व महिला नेमकी कोण आहे, आणि तिने हे कृत्य का केले, याचा शोध घेतला जात आहे.
0 Comments